₹ 100

Validity

Till Further Changes

Seller

Active Deal

Fulpakhru: Collection of Marathi Poems (Marathi Edition)

           ज्याला पाहताच आपण त्याच्या प्रेमात पडतो त्या प्रेमदुताचे नांव फुलपाखरू. ईश्वराने मुक्त हस्ताने ज्याला रंगात बुडविले असा हा साऱ्यांच्या डोळ्यांना आनंद देतो. कुठेही थांबत नाही पंखाची फडफड करून प्रत्येक फुलाच्या कानी कुजबुज करून हळूच त्यांना हलका धक्का देवून दुसऱ्या फुलाकडे धावत असतो रंगाची उधळण करणारा धुंद होवून मध पिवून परागांची यात्रा फुलाफुलांतून घेवून जाणारा हा आनंद यात्री प्रत्येकाच्या मनाला भावूक करीत असतो.

           अशाच प्रकारे विविध रंग छटानी रंगलेले रंगात भिजलेले आयुष्य आपले सुद्धा असते त्या आयुष्यात फुलपाखरा सारखे रंग आपण भरायचे असतात. आपणसुद्धा सुख वाटण्याचे तसेच दुसऱ्याला सुखी करण्याचे ठरविले तर आपल्या मनाला कधीच दुःख होत नाही दुसऱ्याच्या मनाला आनंद देणे साऱ्यांनाच जमत नसते ते ज्यांना जमते ती व्यक्ती नक्कीच असमान्य असते.

           फुलपाखरू हा माझा सातवा काव्यसंग्रह मी वाचकांना सुपूर्द करीत असतांना मनाला आनंद होतो आहे. रंगीबेरंगी दुनिया जगताना जसे आपण खूश होतो तो आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने त्या रंगाला जपले पाहिजे नाहीतर रंगहिन आयुष्य वाटयाला येवून आनंदी होण्याच्या स्वप्नाची वाट पहावी लागेल यासाठी स्वतः सुखी रहा दुसऱ्यांना सुखी करा.


Steps to Get Fulpakhru: Collection of Marathi Poems (Marathi Edition).