₹ 99

Validity

Till Further Changes

Seller

Active Deal

Bhagwan Buddha ani Tyancha Dhamma (Marathi Edition)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे घाव झेलत व अवहेलनेला सामोरे जात, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर, सबंध प्रतिकूलतेवर मात करून ज्ञान संपादन केले. त्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि देशासाठी केला. दलित आणि दलितेतर चळवळीला प्रेरणा दिली. अस्पृश्यांवर होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढले. ते मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविख्यात शिक्षण संस्थांतून सर्वोच्च पदव्या मिळविल्या, तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनमोल कार्य केले. समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे काढली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. असे एकही क्षेत्र नाही की, ज्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी योगदान दिले नाही.

इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच या महामानवाचे महानिर्वाण झाले. इ.स. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर "भारतरत्‍न" या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर यांची आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.


Steps to Get Bhagwan Buddha ani Tyancha Dhamma (Marathi Edition).